नेपाळ येथे एमबीबीएससाठी निवड झाल्याबद्दल चैतन्य मोरे याचा सत्कार
गुणवत्तेपुढे परिस्थिती आडवी येत नाही -पै. बाळासाहेब भापकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक चैतन्य शहाजी मोरे याने नीट परीक्षेत यश संपादन करून, नेपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी निवड झाल्याबद्दल त्याचा नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तालीम सेवा संघाचे सचिव पै. बाळासाहेब भापकर, अध्यक्ष पै. नाना डोंगरे, शहाजी मोरे, विद्या मोरे, आदम शेख, केशव हराळ, एकनाथ पालवे, खांडवे सर, सचिन झावरे, प्रतीक मोरे आदी उपस्थित होते.
पै. बाळासाहेब भापकर म्हणाले की, गुणवत्तेपुढे परिस्थिती आडवी येत नाही. स्वत:मधील गुणवत्तेचा तेज दाखविल्यास त्याला सर्वांचा सलाम असतो. युवकांनी ध्येय समोर ठेवून पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे.
चैतन्य मोरे याने मिळवलेले यश अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, आठवड (ता. नगर) मुळगाव असलेले मोरे परिवारने (सध्या. रा. वसुंधरा पार्क, नगर कल्याण रोड) आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. त्यांच्या मुलाने कष्टाचे चीज करुन कुटुंबाचे नाव उंचावले असल्याचे सांगून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.