• Sat. Oct 25th, 2025

नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना

ByMirror

Apr 5, 2023

धर्मदाय उपायुक्तांची मान्यता

कुस्ती खेळाच्या विकास व प्रचार-प्रसारासाठी कुस्तीगीर संघ प्रयत्नशील -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली असून, नुकतीच त्याला धर्मदाय उपायुक्तांची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.

पै. नाना डोंगरे


शहरी व ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करून युवकांमध्ये खेळाडूवृत्ती वाढीस लागण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली आहे. कुस्तीबरोबरच इतर मैदानी खेळ देखील खेळविण्यात येणार आहे. कुस्तीमध्ये उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचा कुस्तीगीर संघाचा मानस आहे. कुस्ती खेळाच्या विकास व प्रचार-प्रसारासाठी कुस्तीगीर संघ प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.


नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाच्या संस्थापक अध्यक्षपदी पै. डोंगरे, उपाध्यक्षपदी धोंडीभाऊ जाधव, सचिव संदिप डोंगरे, खजिनदार पै. वैभव लांडगे, सदस्य किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, उत्तम कांडेकर हे आहेत. लवकरच मॅट व मातीवरील कुस्ती खेळाकरिता व्यायाम शाळेची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पदाधिकार्‍यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *