रिजनल तायक्वांदो स्पर्धेत पटकाविले सुवर्ण
तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स स्पर्धेत कास्य पदकाची कमाई
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तायक्वांदो खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने रिजनल तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तर नुकतेच झालेल्या तायक्वांदो वर्ल्ड चॅम्पियनशिप व एशियन ट्रायल्स सिलेक्शनसाठी झालेल्या फायनल चॅम्पियन ऑफ चॅम्पियनस् स्पर्धेत पिसाळ याने कांस्य पदक पटकाविले.
रिजनल तायक्वांदो स्पर्धा पनवेल येथे पार पडली. यामध्ये विराज पिसाळ याने 17 वर्षे वयोगटात 41 ते 45 किलो मध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. तर तायक्वांदो वर्ल्ड चॅम्पियनशिप व एशियन ट्रायल्स सिलेक्शनसाठी चॅम्पियन ऑफ चॅम्पियनस् स्पर्धा नाशिक येथे झाली. यामध्ये देखील त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन कांस्य पदकाची कमाई केली.

विराज पिसाळ हा केडगाव येथील एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडू आहे. त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली. इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर व वर्ल्ड तायक्वांदोचे कोऑर्डिनेटर निराश बहारी यांनी विराजच्या खेळाचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याला अकॅडमीचे प्रशिक्षक गणेश वंजारी, नारायण कराळे, अल्ताफ खान, मंगेश आहेर, योगेश बिचितकर, सचिन मरकड, तेजस ढोबळे, मयूर अडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खेळाडूचे एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, प्रा. माणिक विधाते, तायक्वांदो असोसिएशनचे सचिव घनश्याम सानप, खजिनदार नारायण कराळे, सहसचिव दिनेश गवळी, एन. आय.एस. कोच मच्छिंद्र साळुंखे, बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. गजेंद्र पिसाळ, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका स्मिता पिसाळ यांनी अभिनंदन केले.
विराज हा अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांचा नातू असून, तो केंद्रिय विद्यालय क्र. 1 मध्ये शिकत आहे. त्याला विद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक परदेशी सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक यांचेही मार्गदर्शन लाभले.