तुळजा भवानी मातेच्या जय घोष करुन भंडार्याची उधळण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भिंगार येथे तिसर्या माळेला आलेल्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे आगमन झाले असता, भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांनी तुळजा भवानी मातेच्या जय घोष करुन भंडार्याची उधळण केली.
यावेळी मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, भारत ठोकळ, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, प्रमोद पिल्ले, सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते. भिंगार येथे तीसर्या माळेला मध्यरात्री देवीचे पलंग व पालखीची भेट होत असते. यावेळी भाविकांनी दर्शनास मोठी गर्दी केली होती.

