जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- दीपावली सणानिमित्त दिवाळी मागण्यासाठी आलेल्या भटक्या-विमुक्त समाजातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांनी सारसनगर येथे हा सामाजिक उपक्रम राबविला.
दीपावली सणानिमित्त गरजू घटक घरोघरी जाऊन दिवाळी मागत असतात. दिवाळी मागणार्या अल्पवयीन मुलांना आर्थिक मदत देण्यापेक्षा शैक्षणिक साहित्याची मदत देऊन गुगळे यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. धुणी-भांडी करणार्या मोलकरीण भगिनींच्या मुलांना देखील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मिठाई व नवनवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद फुलले होते. या उपक्रमासाठी नुतन गुगळे यांनी देखील पुढाकार घेऊन या उपक्रमात योगदान दिले.