महाराजांना शिवप्रेमींनी दिली दीपोत्सवाची मानवंदना
मराठा सेवा संघ व मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळीचा पहिला दिवा स्वाभिमान महाराष्ट्र घडविणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करुन मराठा सेवा संघ व मराठा समन्वय परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याभोवती दीपोत्सव साजरा करण्यात आला. लखलखत्या पणत्यांचा झगमगाटात शिवाजी महाराजांचा जयजयकार करुन दिवाळीची सुरुवात करण्यात आली.

जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना दिली. यावेळी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, प्रविण सोनवणे, वसंत कर्डिले, गणेश वाबळे, आशा गायकवाड, भाग्येश सव्वासे, पूजा कोटा, संतोष हराळ, अमोल लहारे, आशिष सुपेकर, बापू साठे, महेश काळे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशमय लखलखाटाने सर्वांचे लक्ष वेधले. अनिता काळे म्हणाल्या की, दिवाळी म्हणजे बळीराजाचा उत्सव या उत्सवात बळीराजाचे राज्य निर्माण करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती यांना दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करुन दिवाळीची सुरुवात करण्यात आली आहे. सुरेश इथापे यांनी शिवाजी महाराजांच्या तेजोमय कार्याला साक्ष देत दीपोत्सवाने त्यांना अभिवादन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.