चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम
वारकर्यांच्या सेवेतून पांडूरंगाच्या भक्तीचा आनंद -संजय खामकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने टाकळीमिया (ता. नगर) येथील संत रविदास महाराज पायी दिंडीचे शहरात भक्तीभावाने उत्साहात स्वागत करण्यात आले. आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकर्यांची दिंडी सुखकर होण्यासाठी औषध, रेनकोट व टी शर्टचे वाटप करण्यात आले. तर वारकर्यांची आरोग्य तपासणी करुन लोकनेते सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तथा अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी दिंडीसाठी 11 हजार रुपयाची देणगी दिली.
सावेडी येथे झालेल्या दिंडीच्या स्वागत कार्यक्रमात चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, संतोष कानडे, सुभाष सोनवणे, नितीन उदमले, आदिनाथ बाचकर, देवराम तुपे, इंजि. सुरेश बोरसे, वसंत देशमुख, भास्कर सोनवणे, बाळासाहेब देशमुख, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, बाळासाहेब कदम, गोपीनाथ म्हस्के, अंकुश खरात, भिकाजी वाघ, विनोद कांबळे, विक्की कबाडे, माणिक लव्हाळे, रामदास शेवाळे, अशोक नन्नवरे, भानुदास नन्नवरे, संभाजी कांबळे, प्रतिभा खामकर, डॉ. प्रमोद जगताप, श्रीपती ठोसर गुरुजी, मिनलताई माने, मीनाक्षी साळवे, संपत नन्नवरे, भारत चिंधे, विक्रम गुजर, रुपेश लोखंडे, प्रशांत रोजतकर, भगवान काजळकर, महेश काजळकर, किसन बागडे, कैलास वाघमारे, अरुणा कांबळे, सुनिता महापुरे, गणेश नन्नवरे आदी उपस्थित होते.
संत रविदास महाराज पायी दिंडीचे हे सोळावे वर्ष असून, दरवर्षी चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात येते. संजय खामकर म्हणाले की, वारकर्यांच्या सेवेतून पांडूरंगाच्या भक्तीचा आनंद मिळतो. संत रविदास महाराज पायी दिंडी वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन संत रविदासांच्या समतेच्या विचारांचा जागर करीत आहे. विठ्ठल चरणी नतमस्तक होताना वारकती संत, महात्म्यांच्या विचारांचा प्रसार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
संदीप घनदाट यांनी दिंडीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रमोद जगताप यांनी दिंडीतील वारकर्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. अमोल घोरपडे यांनी वारकर्यांसाठी औषधे उपलब्ध करुन दिली.
