स्त्री शक्तीचा जागर करुन स्वत:वर प्रेम करण्याचा महिलांना संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे संघटन करुन गरजू घटकातील परिवारांना मदत करण्याचे कार्य करणार्या डोनेट फर्स्टचा महिला दिनाचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी रंगला होता. बडीसाजन मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी समर्पण सेवाभावची शपथ घेतली.
स्त्री शक्तीचा जागर करुन स्वत:वर प्रेम करण्याचा कार्यक्रमातून संदेश देण्यात आला. स्वतःचे सर्वस्व विसरून कुटुंबाच्या सर्व जबाबदार्या पार पाडणार्या व विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणार्या स्त्री शक्तीला सलाम करण्यात आले. यावेळी रंगलेल्या संगीतमय कार्यक्रमाचा महिलांनी आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोनेट फर्स्टच्या सर्व महिलांनी परिश्रम घेतले.
