जीतोमुळे स्थानिक लघु उद्योग व व्यवसायाला चालना मिळाली -जनक आहुजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी जीतो महाट्रेड फेअरच्या माध्यमातून संधी निर्माण करुन, हा फेअर यशस्वी केल्याबद्दल जीतो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा यांचा सत्कार उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते जनक आहुजा यांनी केला.
यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, सल्लागार अनिल गुंजाळ, अभिनेते समद खान, जितोचे सदस्य गौतम मुनोत, अलोक मुनोत, प्रितेश दुगड, केतन मुनोत, प्रशांत बोगावत, वासन टोयोटाचे सेल्स मॅनेजर दिपक जोशी आदी उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, जीतो महा ट्रेड फेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना नगर जिल्ह्याकडे आकर्षित करुन स्थानिक लघु उद्योग व व्यवसायाला एक चालना मिळालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील भूमीपुत्रांना एकप्रकारे आत्मविश्वास व उद्योग क्षेत्रात व्यासपीठ निर्माण करुन देण्याचे काम जितोने केल्याचे त्यांनी सांगितले. तर जितोच्या यशस्वीतेसाठी चेअरमन जवाहर मुथा यांनी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी कौतुक केले.