नालेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डीले यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी व कष्टकरी वर्गाला आधार देऊन त्यांच्या विकासासाठी जिल्हा सहकारी बँक योगदान देत आहे. या वर्गाला आर्थिक बळ देण्याचे कार्य केले जाणार आहे. संचालक झाल्यापासून शेतकर्यांची कर्ज मर्यादा वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. कर्मचार्यांचे विमा उतरविण्यासाठी पुढाकार घेतला. संचालक काळात केलेले भरीव कार्य व कर्मचारी, शेतकरी हिताच्या निर्णयामुळे चेरअरमनपदाची संधी मिळाल्याची भावना जिल्हा बँकेचे नूतन चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली. तर जिल्हा बँकेच्या नोकरभरतीमध्ये स्थानिक जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य देण्याचे उद्दीष्ट समोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या चेअरमनपदी शिवाजी कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नालेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. नगर-कल्याण रोड, लोंढे नगर येथे सोसायटीचे ज्येष्ठ संचालक तथा माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार सोहळ्यासाठी चेअरमन विजय गायके, व्हाईस चेअरमन गोवर्धन खंडागळे, सचिव राजेंद्र भागवत, संचालक सुरज रोहोकले, राजेंद्र म्हस्के, दिनेश लोंढे, मनोज लोंढे, संतोष जगताप, राजू शिंदे, चंद्रकांत पाखरे, पांडुरंग तारु, नंदा लांडे, माधुरी लोंढे, उर्मिला नलगे आदींसह नालेगाव व लोंढे नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.
संभाजी लोंढे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांच्या हातून सर्वसामान्य शेतकरी वर्गाची सेवा घडणार आहे. कष्टकरी व शेतकरी वर्ग बँकेला जोडलेला असून, बँकेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.