कर्डिले यांनी कष्टकरी, शेतकरी वर्गाचे नेतृत्व करुन प्रश्न सोडविण्याचे काम केले -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. त्यांची जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी झालेली निवडीमुळे सर्वसामान्य शेतकर्यांना आधार मिळणार आहे. हक्काचा माणूस चेअरमन झाल्याने शेतकरी, कामगार वर्गामध्ये देखील उत्साह असल्याची भावना हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केली.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या चेअरमनपदी शिवाजी कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सपकाळ बोलत होते. या कार्यक्रमासाठी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, अभिजीत सपकाळ, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, दीपक बडदे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, अर्जुनराव बेरड, सुभाष होडगे, मच्छिंद्र बेरड, संपत बेरड, शरद धाडगे, सदाशिव मांढरे, अमोल धाडगे, संतोष हजारे, शरद धाडगे, सुर्यकांत कटोरे, किशोर भिंगारदिवे, ओम हजारे आदी उपस्थित होते.
पुढे सपकाळ म्हणाले की, जिल्हा बँक शेतकर्यांसाठी कामधेनू असून, बँकेच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. कष्टकरी व शेतकरी वर्गाच्या प्रश्नांची माजी मंत्री कर्डिले यांना जाणीव असल्याने बँकेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना शिवाजी कर्डिले यांनी शेतकरी व कष्टकरी वर्गाला आधार देऊन त्यांच्या विकासासाठी जिल्हा सहकारी बँक योगदान देणार आहे. संचालक असताना शेतकरी हिताच्या घेतलेल्या निर्णयामुळे चेरअरमनपदाची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.