महिला दिनाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित नगर तालुका पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान करण्यात आला.
मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी नगर तालुका पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक मोहिनी कर्डक यांचा सत्कार केला.
यावे़ळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पीएसआय चव्हाण, एएसआय धुमाळ, एएसआय घोरपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गांगर्डे, पोलिस हेड कॉन्स्टेबल खेडकर, पालवे, चव्हाण, सोनवणे, बांगर, पोलीस कॉन्स्टेबल जाधव आदी उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, चोवीस तास पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असतात. यामध्ये महिला देखील आपले कर्तव्य बजावून चोखपणे सेवा देतात. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी महिला दिनी त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरिक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या माध्यमातून भालसिंग यांचे सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.