दक्षिण आफ्रिकेत नगरचे चारही धावपटू शहराचे नाव उंचावतील -संजय सपकाळ
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणार्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील धावपटू गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीश मक्कर व विलास भोजने पात्र ठरल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
धावपटूंच्या सत्कार सोहळ्यासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, उपमहापौर गणेश भोसले, सीए किरण भंडारी, उद्योजक गौरव फिरोदिया, संतोष डोंगरे, डॉ. मुळे, अमृत पितळे, डॉ. श्याम तारडे, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, रमेश साके, गणेश भोर, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, संतोष वीर, राजू कांबळे, पवन वाघमारे, सुभाष गोंधळे, अभिजीत सपकाळ, अशोक पराते, एकनाथ जगताप, प्रकाश देवळालीकर, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, बापूसाहेब तांबे, संजय वाकचौरे, सुमेश केदारे, विलास तोतरे, मुन्ना वाघस्कर, विठ्ठल राहिंज, अविनाश जाधव, अविनाश काळे, सिताराम परदेशी, किशोर भगवाने, केशवराव दवणे, माजिद शेख, सूर्यकांत कटोरे, आसाराम बनसोडे, मिलिंद क्षीरसागर, माधव भांबुरकर, चिंतामणी भागवत, नितीन भिंगारकर, राजेंद्र पांढरे, दत्तात्रय कुंदेन, संजय सुपेकर, अजेश पुरी, अमित संकलेचा, जालिंदर अळकुटे, कुमार धतुरे, सचिन कस्तुरे, अशोक भगवाने, किरण फुलारी, राहुल दिवटे, विशाल भामरे, हरी शेलार, विलास आहेर, योगेश चौधरी, राजू शेख, हंश वाघमारे, मिना परदेशी, रतन मेहेत्रे आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, कोरोनानंतर शहरात आरोग्य चळवळीत नागरिकांचा कल वाढत आहे. नागरिक मैदानी खेळाकडे वळत असून, निरोगी व सदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळाची गरज निर्माण झाली आहे. जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेत पात्र ठरलेले चारही नगरचे धावपटू शहराचे नाव उंचावतील. त्यांचे कार्य इतर धावपटूंसाठी प्रेरक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चारही धावपटूंचे अभिनंदन करुन मॅरेथॉन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा पीटरमार्टित्झबर्ग ते डर्बन या दोन शहराच्या 89 किलोमीटरच्या खडतर अंतरादरम्यान 11 जूनला होणार आहे. देशातील 403 तर शहरातून 4 धावपटू यामध्ये सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेला वैभवशाली इतिहास असून, 1921 मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी ही स्पर्धा पहिल्या महायुध्दातील सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात येते. या मॅरेथॉनचे हे 96 वे वर्ष आहे. शारीरिक क्षमतेचा कस लावणार्या व कमी-अधिक तापमानाचा मोठा प्रभाव असलेल्या या स्पर्धेत रनर्सला स्वत:ला सिध्द करावे लागणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा संकल्प चारही धावपटूंनी व्यक्त केला.