शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती पुतळ्याने वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्तिक चौक येथील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्ण कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणा देत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रथम महिला महापौर शिलाताई शिंदे, नगरसेविका अश्विनी जाधव, तृप्ती नागवडे, प्राची शिंदे, पल्लवी शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, चंद्रकांत उजागरे, ओंकार शिंदे, अभिषेक भोसले आदी उपस्थित होते.
