• Wed. Mar 12th, 2025

छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसाठीच्या उपोषणाला फुले ब्रिगेडचा पाठिंबा

ByMirror

Apr 28, 2023

सक्रीय सहभाग नोंदवून चौथार्‍याचे काम सुरु करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांचे सावेडी, प्रोफेसर चौकातील नियोजित स्मारक उभारण्याकरिता तातडीने चौथार्‍याचे काम सुरु करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) स्मारक कृती समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले. या उपोषणात सक्रीय सहभागी होवून फुले ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.


फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर यांनी कृती समितीचे सदस्य अजिंक्य बोरकर, वैभव वाघ, संतोष लांडे, अंकुश चक्कर मोहन गुंजाळ यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, गजेंद्र भांडवलकर, शिवा चव्हाण, सतीश बारस्कर, अंजली आव्हाड, संजय सपकाळ, इंजि. केतन क्षीरसागर, किरण जावळे, स्वप्निल पडोळे, विक्रम बोरुडे, भाऊ पुंड, महेश सुडके, विश्‍वास शिंदे, आशिष भगत, बबलू फाळके, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, योगेश ठुबे, मळू गाडळकर, साधना बोरुडे, गणेश बोरुडे, गणेश गोरे, प्रणव भिंगारदिवे आदी उपस्थित होते.


छत्रपती संभाजी महाराज स्मारकसाठी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याकरिता ई निविदेची प्रक्रिया झालेली असताना देखील संबंधित विभागाकडून चौथर्‍याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. सदर काम सुरू होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी सदर उपोषण करण्यात आले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेसाठी केलेले कार्य मोलाचे आहे. त्यांचे योगदान विसरता येणारे नसून, त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून भावी पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचे फुले ब्रिगेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर तातडीने स्मारकासाठी चौथार्‍याचे काम सुरु करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *