जिल्हाध्यक्षपदी रामदास सातपुते
रविवारी शहरात निशुल्क सर्व रोग निदान शिबिर व चर्मकार वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ (महाराष्ट्र राज्य) संचलित चर्मकार वधू-वर व पालक परिचय समितीची बैठक शहरातील चर्मकार विकास संघाच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये वधू-वर व पालक परिचय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास सातपुते यांची नियुक्ती करुन नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत समितीचे मावळते अध्यक्ष तुकाराम गायकवाड व खामकर यांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, बलराज गायकवाड, रामराव ज्योतीक, अरुण गाडेकर, सर्जेराव गायकवाड, दिलीप कांबळे, आदी उपस्थित होते.
रविवारी दि. 26 मार्च रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मोफत सर्व रोग निदान शिबिर व चर्मकार वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे या बैठकीत नियोजन करण्यात आले. या शिबिराचा व वधू-वर पालक परिचय मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे नूतन जिल्हाअध्यक्ष रामदास सातपुते यांनी केले आहे. तर रविवारी सकाळी 10 वाजता कार्यक्रम स्थळी वधू-वर पालक परिचय मेळाव्यासाठी नोंदणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
चर्मकार वधू-वर व पालक परिचय समितीच्या उपाध्यक्षपदी नानासाहेब शिंदे, कार्याध्यक्षपदी अरविंद कांबळे, सचिवपदी भारत चिंधे, सहसचिवपदी देवराम तुपे, खजिनदारपदी विलास जतकर, महिला प्रतिनिधी रुक्मिणीताई नन्नवरे, सहखजिनदारपदी अनिलकुमार शिंदे, केंद्रप्रमुखपदी श्रीपती ठोसर, सहकेंद्रप्रमुखपदी भाऊसाहेब आंबेडकर, प्रसिद्धी प्रमुखपदी विक्रम गुजर, संजय सोनवणे, दिलीप उदमले, मिनलताई नन्नवरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून बाबासाहेब आंबेडकर, तुकाराम गायकवाड, कैलास कांबळे, सुभाष पाखरे, मीनाक्षीताई साळवे, के.बी. जाधव, बाबासाहेब तेलोरे, अभिमन्यू चव्हाण, संभाजी साळी, लताताई वाघमारे, संपत नन्नवरे, सुरेश बोरसे, नानासाहेब कदम, संभाजी साळे, संजय साळवे, वसंत देशमुख, गंगाराम साळवे, पाराजी साळे, लताताई माने, पांडुरंग पाखरे, रमाकांत जाधव, तुळशीराम गोरे, दिगंबर एडके, दादासाहेब भोसले, मारुती खैरे, सुनंदा सांगळे, रामदास निर्वाण, भास्कर सोनवणे, अशोक कदम, अनिकेत साळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.