जनक आहुजा, महेश मध्यान, जयकुमार रंगलानी व सतिंदर नारंग पुरस्काराने सन्मानित
भाई कुंदनलालजी गुरुद्वारामध्ये जयंती उत्सव उत्साहात साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख समाजाचे दहावे गुरु गोविंद सिंहजी यांची जयंती (गुरु पुरब) तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवा निमित्त गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तर सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान देणार्यांना गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते जनक आहुजा, महेश मध्यान, जयकुमार रंगलानी व सतिंदर नारंग यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संजय आहुजा, विकी कंत्रोड, प्रदीप पंजाबी, राकेश गुप्ता, अनिश आहुजा, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, करन आहुजा, सौरभ आहुजा, सागर कुमार, पियुष कंत्रोड, राज गुलाटी, अॅड. तांदळे, अवतार गुरली, मनिश खुराणा, विकी कंत्रोड, दिनेश कंत्रोड, बबलू खोसला, आकाश मनोचा, विशाल अरोरा, विनीत कंत्रोड, गौरव कंत्रोड, गुरदिपसिंह धुप्पड, सतींदरसिंह नारंग, सनी आहुजा आदींसह शीख, पंजाबी समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुरु गोविंद सिंहजी यांनी धर्म व देशासाठी आपल्या परिवारासह सर्वस्वी बलिदान देवून, धर्माला एक वेगळे स्वरुप दिले. गुरुगोविंद सिंह यांची शिकवण, त्याग व विचार आजही समाजाला स्फुर्ती व प्रेरणा देणारा आहे. सेवाभाव हा शीख, पंजाबी समाजाचा एक धार्मिक भाग असून, कोरोना काळात समाज बांधवांनी दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. समाजात विविध क्षेत्रात कार्यरत राहून सामाजिक योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयंती निमित्त गुरुद्वार्यात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये अखंडपाठ साहेब, किर्तन दरबार व लंगरचा समावेश होता. लंगरने कार्यक्रमाची सांगता झाली.
