• Thu. Mar 13th, 2025

खुल्या तायक्वांदो चषक स्पर्धेत शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंचे यश

ByMirror

Jun 30, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशनच्या खेळाडूंनी केडगाव येथे झालेल्या खुल्या तायक्वांदो चषक स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई केली. यामध्ये खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य व चार कास्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत जिह्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.


झालेल्या खुल्या तायक्वांदो स्पर्धेत या अकॅडमीचे खेळाडू वैष्णवी ठोकळ हिने सुवर्ण, आज्ञा चौधरी, समृद्धी गारुडकर, संस्कृती जाधव यांनी रौप्य तर निकिता देवकर, धनश्री कापरे, सुजल जाधव, शिवराज करंजुले यांनी कास्य पदक पटकाविले.


प्रशिक्षक सुरेश जाधव म्हणाले की, शिक्षणाबरोबर खेळाला देखील महत्त्व आले आहे. अनेक मुला-मुलींनी खेळातून आपले करियर घडविले आहे. सध्या समाजात अपप्रवृत्तींना प्रतिउत्तर देण्यासाठी व स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कराटे व तायक्वांदो मुलींसाठी प्रभावी आहे. स्वसंरक्षणासह शारीरिक तंदुरुस्तीसाठी हे खेळ उपयुक्त असून, ग्रामीण भागातील मुला-मुलींना सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे म्हणाले की, मैदानी खेळाने बुद्धीला चालना मिळून मन देखील एकाग्र बनते. शारीरिक व्यायाम झाल्याने सदृढ आरोग्य लाभत असते. निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी या स्पर्धेत यश प्राप्त करणार्‍या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशनच्या वतीने चास, कामरगाव व अकोळनेर येथील खेळाडूंना प्रशिक्षक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण दिले जात आहे. या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *