आशिया खंडातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक तथा क्रीडा शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांना नवी दिल्ली येथे ग्लोबल एम्पायर इव्हेंटचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आशिया खंडातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
इंग्लंड देशातील हाऊस ऑफ लॉर्डचे मेंबर ऑफ पार्लमेंट डॉ. दलजीतसिंग राणा यांच्या हस्ते ओव्हाळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कांसुल जनरल ऑफ द रिपब्लिक ऑफ पलाऊ इंडिया डॉ. नीरज शर्मा होनारारी, रिपब्लिकन तूनिशीया शबिना सुलतान, विंग कमांडर राजेन्द्र चौधरी, लुधियाना नवाब मिर नासिर अली खान (रिपब्लिकन काझगीस्तान), दिपक सिंह (कल्चरलं अंबेसिडोर गवर्नमेंट ऑफ सीचल्स) आदी मान्यवर उपस्थित होते.

मच्छिंद्र ओव्हाळ यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग योगदान पाहता तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदान शिक्षक संघटनात्मक पातळीवर असलेले कार्य त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. रेडीसन ब्लू नवी दिल्ली येथे सेव्हन स्टार हॉटेल मध्ये हा कार्यक्रम पार पडला.
ओव्हाळ सर यांना दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केले. यावेळी युवा उद्योजक योगेश भानुसे उपस्थित होते. राज्याचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, युवा सेना विभागीय सचिव अविनाश भाऊ बलकवडे, मुख्याध्यापक अंबादास रोडे, माऊलीदादा शिवले, गुंफाताई इंगळे, राजाराम शिवले, नवनाथ शिवले, संतोष शिवले, राजेंद्र ओव्हाळ, नारायण लोणकर आदींनी ओव्हाळ यांचे अभिनंदन केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
