जय हिंद फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन वाटप
समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षणाबरोबर संस्काराची गरज -शिवाजी पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)-कोल्हार (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले.
प्रारंभी राष्ट्र ध्वज फडकविण्यात आला. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पालवे, मदन पालवे, रोहिदास पालवे, सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पालवे, शर्मा पालवे, अभिजीत पालवे, सोपान पालवे, माजी मुख्याध्यापक महादेव पालवे, नामदेव जावळे गुरुजी, देविदास पालवे, गणेश पालवे, ऋषी पालवे, एकनाथ पालवे, किसन पालवे, मुख्याध्यापक ठिपसे सर, आव्हाड सर, आंधळे, कैलास पालवे, वैभव पालवे, प्रा. प्रेमकुमार पालवे, किशोर पालवे, सोपानराव पालवे आदी उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी संस्कारक्षम शिक्षणाची गरज आहे. फक्त शिक्षणाने गुणवत्ता व ज्ञान मिळणार आहे. मात्र संस्काराने भावी पिढीमध्ये देशभक्ती, प्रेम, सद्भावना, माणुसकी व प्रामाणिकपणा अंगीकारला जाणार आहे. सुसंस्कारी विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होऊन, सर्वसामान्य व गोरगरिबांसाठी न्याय देण्याचे काम करणार आहे. यामुळे एक चांगला समाज निर्माण होऊन देश प्रगती साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांनी मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचे आवाहन त्यांनी केले.
