• Wed. Nov 5th, 2025

केडगावात शिवदिंडीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जागर

ByMirror

Feb 23, 2023

ज्ञानसाधना गुरुकुल व साई सेवा मंडळाचा शिवजयंतीचा उपक्रम

वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी जिवंत केला शिवाजी महाराजांचा इतिहास

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावमध्ये शिवदिंडी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमाचा जागर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथे ज्ञानसाधना गुरुकुल व साई सेवा मंडळाच्या (मोहिनीनगर) वतीने शिवदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.


ही शिवदिंडी केडगावच्या प्रमुख रस्त्यावरुन मार्गस्थ झाली. मोहिनी नगर येथे साई सेवा मंडळ व महिला मंडळाच्या वतीने या शिवदिंडीचे स्वागत करण्यात आले. या दिंडी मिरवणुकीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढून दिंडीवर फुलांचा वर्षावर करण्यात आला. तर दिंडीस पुष्पहार अर्पण करुन शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.


दिंडीच्या समारोपानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व स्पर्धा पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या भाषणातून जिवंत केला.

या कार्यक्रमासाठी नगरसेवक मनोज कोतकर, संभाजी पवार, मुख्याध्यापक संदीप भोर, प्रा. कांडेकर सर, काळे सर, साई सेवा मंडळाचे दत्तात्रय चेमटे, स्वप्निल परांडे, अमित ढोरसकर, जगन्नाथ चेमटे, निलेश चेमटे, अनिरुद्ध दंडवते, ज्ञानेश्‍वर शिंदे, विलास गारुडकर, उमेश शेळके, लंडन किड्सच्या प्राचार्या रुचिता जमदाडे, प्रा.शाहरुख शेख, निशिगंधा गायकवाड, शबाना शेख, मेधा कुलकर्णी, रुक्मिणी साबळे, आरती शिरसाठ, रुकय्या शेख, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे, प्रा. निखिल कार्ले आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *