अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे शिवसेनेच्या वतीने मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरु करण्यात आले असून, प्रौढ मतदारांसह नव्याने स्थायिक झालेल्या नागरिकांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
रंगोली चौक येथे या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमोल येवले, पप्पू ठुबे, विठ्ठल महाराज कोतकर, सुनील सातपुते, ओंकार सातपुते, मुकेश जोशी, वैभव पाटील, वृषभ शिंदे, तुषार नानेकर, आकाश शिंदे, अभय कारखिले आदींसह नागरिक उपस्थित होते.
दिलीप सातपुते म्हणाले की, केडगाव येथे मागील काही वर्षापासून लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. व्यवसाय व कामानिमित्त या उपनगर भागात नागरिक राहण्यासाठी आले आहेत. अशा नागरिकांची स्थलांतरित किंवा नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यात आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, राहत्या ठिकाणी त्यांची मतदान यादीत नाव राहण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तर 30 जुलै पर्यंत योग्य ती कागदपत्राची पूर्तता करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.