शिवाजी महाराजांच्या पालखीने वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या केडगाव मधून काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय झाले होते.

हातात भगवे ध्वज व शिवकालीन वेशभुषा परिधान करुन विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. मिरवणुकीतील शिवाजी महाराजांची पालखी आणि शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थी मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पूजन करुन मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह संस्थेचे सचिव संदीप भोर, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमदाडे, शाळेच्या प्राचार्या रुचिता जमदाडे, निशिगंधा गायकवाड, सुप्रिया मुळे, पल्लवी पाटील, कल्याणी लोळगे, मेधा कुलकर्णी, रुक्मिणी साबळे, किरण खांदवे, शशिकांत पाटील, अशोक चव्हाण, विठ्ठल नगरे आदी सहभागी झाले होते.

मिरवणुक पहाण्यासाठी पालक व नागरिकांनी गर्दी केली होती. मिरवणुकीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पाण्याचा सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या.