• Sat. Mar 15th, 2025

केडगावला रंगला हनुमान चालिसा व भजन संध्या

ByMirror

Apr 18, 2023

भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील शाहूनगर बसस्थानक परिसरात सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला होता. भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ, ओंकार नगर मित्र मंडळ व शाहूनगर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्री दक्षिण मुखी हनुमान सत्संग मंडळाने (सर्जेपुरा) सादर केलेल्या या भक्तीमय कार्यक्रमात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. रात्री उशीरा पर्यंत भजन संध्येने या कार्यक्रमाची रंगत वाढविल्याने संपूर्ण परिसर भक्तीमय बनले होते. या कार्यक्रमात साईबाबांचे भक्ती गीत व त्यांच्या रुपात अवतरलेल्या व्यक्तींने सर्वांचे लक्ष वेधले. या भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन झाले होते.


यावेळी उद्योजक सचिन कोतकर, नगसेवक गणेश ननावरे, भुषण गुंड, रामदास येवले, विक्रम लोखंडे, बलभीम कर्डीले, राजन कुलकर्णी, सचिन कुलथे, प्रवीण दिवटे, प्रताप मोहिते, भाऊसाहेब जाधव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उद्योजक जयद्रथ खाकाळ, युवा उद्योजक योगेश खाकाळ, प्रदीप खाकाळ संपुर्ण खाकाळ परिवाराचे सहकार्य लाभले. भाविकांना यावेळी प्रसादचे वाटण्यात आले. प्रभू श्रीराम व हनुमानजींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *