अहमदनगर (प्रतिनिधी)- वृत्तवाहिनीचे काम पहाणारे दिपक कासवा यांची केंद्रीय पत्रकार संघ (सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन) दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कासालकर यांचे हस्ते कासवा यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
शिर्डी येथे झालेल्या केंद्रीय पत्रकार संघाच्या संमेलनात त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राज्यभरासह, जिल्ह्यातील व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपक कासवा अनेक वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मिडीयात पत्रकार म्हणून काम करत आहे.
कासवा हे संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहून कार्य करणार आहे. तसेच पत्रकारांच्या विविध समस्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.