मराठा महासंघ व निमगाव वाघा ग्रामस्थांनी केला सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत सदस्य भरत साहेबराव बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल मराठा महासंघ व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा मराठा महासंघाचे नगर तालुकाध्यक्ष पै. नाना डोंगरे, उद्योजक कोंडीबा फलके, भागचंद जाधव, श्याम जाधव, नामदेव फलके, बळवंत खळदकर, भाऊसाहेब जाधव, राजू खळदकर, सुनील जाधव, राजू हारदे, संदीप डोंगरे, संदीप जाधव, बाळू फलके आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, बोडखे परिवार काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिला असून, त्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. साहेबराव बोडखे यांनी स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या कार्यकाळात नगर तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यास मोठे योगदान दिले होते. भरत बोडखे यांचे देखील युवकांशी जनसंपर्क मोठा असून, पक्ष वाढीसाठी ते उत्तम प्रकारे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना भरत बोडखे यांनी नगर तालुक्यात पक्षाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी योगदान देणार आहे. युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य केले जाणार असून, गावोगावी युवकांचे संघटन करुन, गाव तेथे शाखा उघडण्यात येणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न केंद्रभूत मानून ते सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.