कामकाजाची केली पहाणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. बँक मुंबईचे महाव्यवस्थापक (प्रशा) सुर्यकांत जगताप यांनी नुकतीच अहमदनगरला भेट दिली. एस.टी. बँकेच्या श्रीरामपूर शाखेची त्यांनी पहाणी करुन कामकाजाचा आढावा घेतला.
एस. टी. बॅकेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग व ज्यूनीअर ऑफीसर मोहन भुजाडी यांनी जगताप यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी नानासाहेब महांडुळे, शिवाजी गायके, बाळासाहेब खरमाळे आदी उपस्थित होते. जगताप यांनी एस.टी. बँकेच्या श्रीरामपूर शाखेच्या कामकाजाबद्दल सुचना केल्या.