महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव
दिल्लीला पुरस्काराने केला जाणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या शिक्षणासाठी करत असलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या उषा अशोक शिंदे यांना सावित्रीची लेक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. लोकशाहीर जनकल्याण सेवा समितीचे महासचिव विक्रम सोळसे यांनी नवी दिल्ली येथे होणार्या सावित्रीच्या लेकी पुरस्कारासाठी शिंदे यांचे नाव जाहीर करुन त्यांना पुरस्काराचे पत्र दिले.

अशिक्षीत महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणारे व शिक्षणाचा प्रचार-प्रसार करणार्या महिलांना लोकशाहीर जनकल्याण सेवा समितीच्या वतीने सावित्रीची लेक पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. 2022-23 वर्षाचा पुरस्कार शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
शिंदे या शेवगाव तालुक्यात शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करत आहे. अशिक्षीत महिलांना घरोघरी जावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व दुर्बल घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी ते कार्य करत आहेत.
गरजू मुलींना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देणे, शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचे कार्य त्या करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शिंदे यांना सावित्रीची लेक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
