• Wed. Nov 5th, 2025

आदित्य ठाकरे यांना नगरमधील कार्यकर्त्याचे थेट प्रतिआव्हान

ByMirror

Feb 5, 2023

ठाकरे यांचे मुख्यमंत्री यांना निवडणुकीच्या आव्हानाला शिंदे गटातून उत्तर

नगरमधून कोणत्याही निवडणुकीतून विजय मिळवून दाखवावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुकीचे आव्हान देत असताना, शिवसेनेचे ठाकरे गट व शिंदे गटामध्ये तीव्र संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या वक्तव्याचे पडसाद शिंदे गटातील बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये उमटत असून, अहमदनगर मधील शिवसेना सावेडी विभाग प्रमुख काका शेळके यांनी थेट आदित्य ठाकरे यांना निवडणुकीचे अहमदनगरमधून आव्हान दिले आहे.


नुकतेच आदित्य ठाकरे यांनी मुंबई चेंबुर मधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले. यासाठी ठाकरे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवून निवडणुकीला सामोर येण्याचे खुले आव्हान दिले. यावर शेळके यांनी आदित्य ठाकरे यांना कोणत्याही निवडणुकीत आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर निवडणुक लढवून विजत मिळवून दाखविण्याचे प्रतिआव्हान दिले आहे.


निवडणुकीसाठी एक सच्चा कार्यकर्ता असणे गरजेचे असते. हिंदूह्रद्य सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने नगरचे मा. आ. स्व. अनिल राठोड यांच्या तालमीत आंम्ही तयार झालो आहेत. एक कार्यकर्ता म्हणून मी निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे. कोणत्याही पक्षप्रमुखांचा मुलगा नसून, जो मुंबईत बसून फक्त आदेश करत असतो. सर्वसामान्य शिवसैनिक व एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याशी निवडणुक लढविण्याचे शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.


तर माझी आई ही एक भाजीवाली असून, महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून येऊन सभापती झाली. हे फक्त बाळासाहेबांच्या विचारधारेच्या शिवसेनेतच शक्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *