विस्तार अधिकारी अलीम शेख यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म.अल्ताफ इब्राहीम माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विस्तार अधिकारी अलीम अ. अजीज शेख यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा गौरव करण्यात आला.
या सेवापूर्ती कार्यक्रमात शाळेच्या संचालिका डॉ.आस्मा शाहीद काझी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समीउल्ला शेख, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एजाज शेख यांनी विस्तार अधिकारी अलीम शेख यांचा सत्कार केला. यावेळी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी अजीज यांनी दिलेल्या सेवाकार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अलीम शेख हे प्राथमिक शिक्षक म्हणून शेवगाव या ठिकाणी रुजू झाले होते. त्यानंतर नेवासा तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून काम केले. 2018 पासून विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी पाच वर्ष विस्तार अधिकारी म्हणून कामकाज केले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व गुणात्मक विकासासाठी नेहमी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
