सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री नवनाथ युवा मंडळ व कै.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अविनाश बाबासाहेब साठे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या हस्ते साठे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निमगाव वाघ (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक अनिल कटके, पै. नाना डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अविनाश साठे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल साठे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भोयरे खुर्दचे सरपंच राजूशेठ आंबेकर, उपसरपंच रावसाहेब शिंदे, राजेश बोरकर, भोयरे पठारचे सरपंच बाबासाहेब टकले, ग्रा. प सदस्य दत्ताभाऊ साठे, भोयरे पठारचे चेरमन गणेश मुठे, उद्योजक बबन टकले, माजी सरपंच संपत बोरकर, आप्पासाहेब मुठे, रवी आंबेकर, रिंकू आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल टकले, अशोक टकले, राहुल आंबेकर, किशोर सूर्यवंशी, सचिन बोरकर, नानासाहेब आंबेकर, संपत आंबेकर, दादाभाऊ बोरकर, दत्ता बोरकर, मच्छिंद्र पगडे, बाळू बोरकर, ऋतिक बोरकर, गणेश उरमुडे, अमोल उमाप, जिग्नेश उमाप, परशु बोरकर, गणेश जरे, अक्षय टकले, राम उरमुडे, भरत टकले, योगेश गाडे, संकेत उमाप, शुभम उमाप, किरण पंडित, प्रवीण उमाप, पप्पू उरमुडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल साठे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.