तपासात हलगर्जीपणा करणार्या त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन व्हावे,
तर आरोपींना अटक करुन मुलींचा शोध लावण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन, दीड महिने उलटूनही तपास लागत नसल्याने चर्मकार विकास संघाच्या वतीने पिडीत कुटुंबीयांसह गुरुवारी (दि.27 ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील व पोलीस अधीक्षक राजेश ओला यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, जन आधार संघटनेचे प्रकाश पोटे, कामगार संघटनेचे कॉ. अनंत लोखंडे, बहुजन लोक अभियानचे सचिव वसंत सकट, वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण, प्रहार जनशक्तीचे विनोद परदेशी, मानव विकास अधिकारच्या महिला जिल्हाउपाध्यक्षा सुप्रिया काळे यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. तर आंदोलनात चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, मेजर दिपक गायकवाड, काकडे मेजर, सुभाष सोनवणे, मोहन पवार, छबाबाई पवार, वृषाली पवार, अशोक शेवाळे, अमोल डोळस, मनोज गवांदे, बलराज गायकवाड, चांगदेव देवराय, विठ्ठल देवरे, सुरेख देवरे, कैलास वाघमारे, संतोष कानडे, अर्जुन कांबळे, संतोष कदम, संदिप डोळस, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, उत्तमराव सावंत, सुनिल साळवे, अविनाश भोसले, सुनिल डहाणे, प्रतिक नरवडे, अजय आंग्रे, संदीप सकट, गोपीनाथ गाडे, नाना महादु शिंदे, अरुण गाडेकर, भिकाजी वाघ, भानुदास नन्नवरे, ज्ञानेश्वर वाघमारे, अतुल साळवे, बाळासाहेब कांबळे, गणेश लव्हाळे, निखील पवार, कांतीलाल पवार, रामदास गवळी, दिलीप बोडखे, सुरेखा देवरे, सुरेखा संतोष कानडे, दत्तात्रय सोनवणे, सुरेश शेवाळे, डॉ. ऋषीकेश उदमले यांनी सहभागी झाले होते.
श्रीगोंदा येथील एका गावात राहणार्या हातावर पोट असलेल्या चर्मकार समाजातील शालेय विद्यार्थिनी बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी 29 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन तब्बल दीड महिना झाला असून, पोलीस निरीक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याने सदर मुलीचा तपास लागलेला नाही. बेपत्ता अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबातील सदस्य पोलीस निरीक्षक यांच्याकडे चौकशीसाठी वेळोवेळी विनवणी करीत होते. परंतु पोलीस निरीक्षक यांनी संबंधित कुटुंबाला धमकावून हाकलून लावले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
बेपत्ता मुलगी सापडत नाही म्हणून, मुलीच्या कुटुंबीयांनी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आरोपी व आरोपींना मदत करणार्या लोकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मात्र आजपर्यंत बेपत्ता मुलीचा शोध लागलेला नसून, आरोपी मोकाट फिरत आहे. या घटनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक आपल्या कर्तव्यात कसूर करुन बेपत्ता मुलीचा शोध लावण्यासाठी कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले होते. याप्रकरणी कारवाई होत नसल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून निलंबन करावे, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ आरोपींना तात्काळ अटक करावी, बेपत्ता मुलीचा तात्काळ शोध लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक राजेश ओला यांच्याशी झालेल्या भेटीत बेपत्ता अल्पवयीन मुलीचा तपास लाऊन आरोपींवर कारवाई करण्याचे व तपासात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांची चौकशी करण्याचे ओला यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरता मागे घेण्यात आला असल्याची माहिती संजय खामकर यांनी दिली. याप्रकरणी एका आठवड्यात कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर महाआंदोलन केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.