लाल बावटा जनरल कामगार युनियन, अवतार मेहेर बाबा कामगार ट्रस्टचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त अरणगाव (ता. नगर) येथील संत बुवाजीबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त भाविकांना लाल बावटा जनरल कामगार युनियन, अवतार मेहेर बाबा कामगार ट्रस्टच्या कर्मचार्यांच्या वतीने भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी द्वादशीला साक्षात पांडुरंग उपवास सोडायला अरणगाव (ता. नगर) येथील श्री संत बुवाजी बुवा महाराज मंदिरात येतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी आषाढी एकादशीला गावात मोठा धार्मिक उत्सव साजरा केला जातो. शहर व तालुक्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथील बुवाजीबुवा मंदिरात येत असतात. आलेल्या भाविकांना उपवासासाठी फळांचे वाटप युनियनच्या कर्मचार्यांनी केले.
यावेळी संघटनेचे युनिट अध्यक्ष सतीश पवार, संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, प्रवीण भिंगारदिवे, सुभाष शिंदे, सुनील दळवी, राधकिसन कांबळे, प्रभा पाचारणे, सुनीता जावळे, संदीप शिंदे, रघुनाथ नाट, संजय ढवळे, बबन गहिले आदी उपस्थित होते. आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अॅड. सुधीर टोकेकर यांनी सर्व भाविकांना आषाढी एकादशी व यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या.