उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्थेत युवा उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. तसेच गो शाळेत चारा देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते इमरान शेख, शेहबाज शेख, प्रताप राऊत, रोहित शिंदे, वैभव वाघ, गौरव चक्रणारायण, मुन्ना शेख, फारुख शेख, कलीम पठाण, पप्पू कुसळकर, सोफियांन शेख, ऋतिक जाधव, डॉ.गौरव तुपे, अर्जुन माळी, सचिन पवार आदी उपस्थित होते.
सोनई येथील कापड व्यवसायातील युवा उद्योजक जाकीर जहागीरदार नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी त्यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला. इमरान शेख यांनी सामाजिक भावनेने उद्योजक जहागीरदार देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. त्यांनी युवकांना सामाजिक दिशा देण्यासाठी त्यांचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे, ते म्हणाले.

जाकीर जहागीरदार म्हणाले की, समाजातील वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज आहे. दिव्यांग मुले समाजातील एक घटक असून, त्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.