कलागुण संपन्न असलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य हेल्पिंग हॅण्ड्स करत आहे -आप्पासाहेब होले
अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याची वाढती तीव्रता लक्षात घेऊन हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशन, बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊस व शिवम टिव्हीएसच्या वतीने निरीक्षण व बालगृहातील कलाकार विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवम टिव्हीएसचे संचालक अप्पासाहेब होले, सामाजिक कार्यकर्ते किरण बोरुडे, हेल्पिंग हॅण्ड्सचे सस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर आदी उपस्थित होते.
आप्पासाहेब होले म्हणाले की, सामाजिक जाणीव ठेऊन हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवाहात आनण्यासाठी व त्यांना योग्य दिशा देण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, कलागुण संपन्न असलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य हेल्पिंग हॅण्ड्स करत असल्याचे त्यांनी सांगितले. भैय्या बॉक्सर यांनी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. कलाकार, खेळाडू व विविध क्षेत्रात आपले करिअर करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.