• Fri. Mar 14th, 2025

सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या डोंगरे कुटुंबीयांचा गौरव

ByMirror

Sep 28, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या निमगाव वाघा येथील डोंगरे कुटुंबीयांचा मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.


मार्केटयार्ड येथील किसान क्रांती बिल्डिंगच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात एनआयस कुस्ती प्रशिक्षिका प्रियंका डोंगरे-ठाणगे, राष्ट्रीय कुस्तीपटू तथा ज्युदो खेळाडू प्रतिभा डोंगरे व पै.संदिप डोंगरे यांचा तर क्रीडा क्षेत्रातील योगदान व उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला. यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुरेश इथापे, मनोज ढोकचवळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, ज्ञानदेव पांडुळे, पोपटराव काळे, राजश्री शितोळे, किशोर मरकड, संपुर्णा सावंत, जिल्हा उद्योग अधिकारी अतुल ढवंगे, कारागृहाचे अधीक्षक ज्ञानेश्‍वर काळे आदी उपस्थित होते.


प्रियंका डोंगरे-ठाणगे हीने कुस्ती प्रशिक्षकांसाठी असलेला एनआयएस प्रशिक्षण पुर्ण केल्याबद्दल, तर प्रतिभा डोंगरे व पै.संदिप डोंगरे यांनी राज्यस्तरीय ज्युदो आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पै.नाना डोंगरे यांचे मागील वीस वर्षापासून क्रीडा व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेले उत्कृष्ट कार्य व राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *