संविधान चषक वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मध्ये रविवारी (दि.23 एप्रिल) राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संविधान चषक आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहमदनगर, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या खुल्या गटाच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी केले आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, संध्याकाळी चार वाजे पर्यंत चालणार आहे. भारतीय संविधानाची मूळ संरचना, भारतीय राज्यघटनेचा सरनामा, संविधानास अभिप्रेत असलेला भारत आणि लोकशाही व संविधान हे चार विषय देण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 3 हजार, द्वितीय विजेत्यास 2 हजार व तृतीय विजेत्यास 1 हजार रुपये रोख, करंडक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ विजेत्याला करंडक व प्रमाणपत्र दिला जाणार आहे.
ही स्पर्धा मराठी भाषेत होणार असून, पाच ते दोन मिनिटं कालावधी स्पर्धकांना दिला जाणार आहे. स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून, स्पर्धा संपताच निकाल जाहीर करून पारितोषिक वितरण होणार आहे. स्पर्धेची नोंदणी ऑनलाईन करता येणार असून, यासाठी बारकोड देण्यात आला असल्याची माहिती संयोजन समितीचे सुभाष सोनवणे, संतोष कानडे, एजाज पिरजादे, संदीप सोनवणे यांनी दिली. अधिक माहितीसाठी सुभाष सोनवणे 9860159491 व संतोष कानडे 9763922027 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.