राजकारणातील समाजकारणी व्यक्तीमत्व म्हणून डोंगरे यांचे कार्य – आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देत असल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांनी गौरव केला. निमगाव वाघा (ता. नगर) येथे झालेल्या एका कार्यक्रमात डोंगरे यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, माजी मुख्याध्यापक किसन वाबळे, भरत बोडखे, अतुल फलके, योगेश जाधव, अतुल जाधव, पंकज वाबळे, पिंटू जाधव, जयराम जाधव आदी उपस्थित होते.
आमदार निलेश लंके म्हणाले की, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, साहित्य, पर्यावरण, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा चळवळ रुजविण्याचे काम पै. नाना डोंगरे करत आहे. युवकांना दिशा देण्यासाठी डोंगरे विविध उपक्रम राबवित आहे. ते ग्रामपंचायतचे सदस्य असून, राजकारणातील समाजकारणी व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अनेक पुरस्कार प्राप्त करुन निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देणारे डोंगरे गावाचे भूषण असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, समाजकारण हे एकमेव ध्येय ठेऊन सर्वच क्षेत्रात कार्य सुरु आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून युवकांना बरोबर घेऊन समाजकार्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
