नगर तालुक्यात खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे योगदान कौतुकास्पद -प्रतापपाटील शेळके
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषदेच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रतापपाटील शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जखणगाव (ता. नगर) येथे झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबापाटील सोनवणे, जखणगावचे माजी सरपंच बी.आर. कर्डिले, छबुराव कांडेकर, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक सुनिल सोनवणे, उद्योजक दीपक सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, खातगाव सरपंच मिठू कुलट, डॉ. विजय जाधव, सुधीर सोनवणे, गुलाब सोनवणे, तुळशीराम सोनवणे, सुनिल दाते, महेश सोनवणे, दिनेश सोनवणे आदी उपस्थित होते.
प्रतापपाटील शेळके म्हणाले की, नगर तालुक्यात खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा क्षेत्रात पै. नाना डोंगरे यांचे योगदान कौतुकास्पद आहे. क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात डोंगरे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. डोंगरे कुस्तीसह इतर खेळाच्या विविध स्पर्धा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.
माधवराव लामखडे यांनी नाना डोंगरे यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आबापाटील सोनवणे म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे पै. नाना डोंगरे सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव असून, ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यास देखील त्यांचे प्रयत्न सुरु आहे. त्यांचे सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.