अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम
केमिस्ट बांधव व नागरिकांमध्ये आरोग्याचे ऋणानुबंध -दत्ता गाडळकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केमिस्ट बांधव व नागरिकांमध्ये आरोग्याचे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. रुग्णांना औषध उपलब्ध करुन देण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रमातून केले जात असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी केले.
अहमदनगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे यांच्या प्रेरणेने श्रवण दोष असलेल्या गरजूंना मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष गाडळकर बोलत होते. सावेडी, भूतकरवाडी येथे झालेल्या श्रवणदोष तपासणी शिबिरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष भरत सुपेकर, सचिव मनिष सोमाणी, खजिनदार मनोज खेडकर, अशुतोष कुकडे, रुपेश भंडारी, अमित धाडगे, संकेत गुंदेचा, महेश आठरे, कमलेश गुंदेचा, अवधुत बोरुडे, युवराज खेडकर, राहुल जाधव, अभिजीत गांगर्डे, संदीप डहाळे, आदेश जाधव, गणेश कटके, केतन बोरा, उमेश बनकर, मनिष फुलडहाळे, भुपेंद्र खेडकर, पराग झावरे, किरण रासकर, अमित गोयल, श्रीनिवास बोडखे, अक्षय हजारे, तेजस स्वामी आदींसह शहरासह जिल्ह्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे गाडळकर म्हणाले की, केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता केमिस्ट बांधव संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक व आरोग्यदायी उपक्रम राबवित असतात. संघटनेच्या माध्यमातून गरजूंना आरोग्य सेवेचा आधार देण्याचे कार्य सातत्याने सुरु असून, गरजू घटकांशी सामाजिक बांधिलकी निर्माण केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराला शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये 114 गरजू रुग्णांना प्रत्येकी दोन हजार रुपये किंमतीचे श्रवणयंत्र मोफत वाटप करण्यात आले. या शिबिराला स्वामी हिअरींग अॅण्ड क्लिनिक यांचे सहकार्य लाभले. तसेच केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अरुणोदय गो शाळेला जनावरांसाठी चारा देखील वाटप करण्यात आले.

