• Thu. Mar 12th, 2026

शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा

ByMirror

Sep 25, 2022

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने वतीने शिवाजी महाराज व महात्मा फुलेंचा जयघोष

या दिवशी बहुजन समाज कर्मकांडातून मुक्त झाला -डॉ. भास्कर रणनवरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पध्दतीने झालेला दुसरा राज्यभिषेक दिन व महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना दिवस भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने साजरा करण्यात आला.


जुने बस्थ स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचा जय घोष करण्यात आला. यावेळी प्रा. एल.बी. जाधव, प्रा. विलास साठे, संजय वाकचौरे, ज्ञानेश्‍वर खराडे, संजय कांबळे, प्रकाश साळवे, विजय भांबळ, राजू आहेर, शिवाजी भोसले, प्रा.डॉ. प्रदीप चौधरी, डॉ. भास्कर रणनवरे, अशोक साळवे आदी उपस्थित होते.


डॉ. भास्कर रणनवरे म्हणाले की, 24 सप्टेंबर 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवैदिक पध्दतीने दुसरा राज्यभिषेक केला. तर याच दिवशी 1873 साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन गुरुस्थानी मानलेल्या रयतेच्या राजाला मानवंदना दिली. तसेच 1932 रोजी या दिवशी पुणे करार टॅक्ट करार धिक्कार दिन होता. हा बहुजन समाजासाठी महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी सत्यशोधक समाजाची निर्मिती होऊन बहुजन समाज कर्मकांडातून मुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. एल.बी. जाधव म्हणाले की, महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानले होते. त्यांची समाधी शोधून त्यांच्यावर पोवाडे लिहिले. शिवाजी महाराजांच्या विचारांनी त्यांनी बहुजन समाजाला सत्यशोधक वृत्तीकडे नेले. हा दिवस बहुजन समाजाला अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *