मराठा सेवा संघ व मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमान महाराष्ट्र घडविणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा सेवा संघ व मराठा समन्वय परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याभोवती दीपोत्सव साजरा करण्यात आला. लखलखत्या पणत्यांचा झगमगाटात शिवाजी महाराजांचा जयजयकार करुन शिवजयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना दिली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

महिला भगवे फेटे बांधून या अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तर युवक-युवतींनी आस्ते कदम.. आस्ते कदमच्या गजरात छत्रपती शिवरायांची गारद दिली.

यावेळी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, मायाताई हराळ, मिनाक्षी जाधव, रेखा फिरोदिया, अनुराधा येवले, प्रियंका आठरे, स्वाती जाधव, ज्योती कदम, सुजाता पुजारी, सुनंदा नागवील, मनपाचे उप अभियंता श्रीकांत निंबाळकर, वैभव जोशी, वसंत कर्डिले, गणेश वाबळे, राहुल गीते, रिजवान शेख, अमोल लहारे, मिनीनाथ कोतकर, महादेव कोतकर आदी उपस्थित होते.
