अद्यावत हेअर, स्किन, मेकअप व बॉडी ट्रीटमेंटची सुविधांचा समावेश
फॅशनच्या युगात युवक-युवतींमध्ये चांगले दिसण्यासाठी जणू स्पर्धाच -आमदार अरुणकाका जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामचंद्र खुंट येथे मोठ्या शहरांच्या धर्तीवर सुपर लक्झरीयस सुविधा असलेल्या गोल्डन सलूनचा शुभारंभ आमदार अरुणकाका जगताप व हज्जन आरेफा अल्ताफ शेख यांच्या हस्ते झाला. यावेळी हाजी जुनेद अल्ताफ शेख (सिमला), मुश्ताक हाजी इब्राहिम शेख, हाजी शकिल शेख, हाजी फकिर मोहंमद सय्यद, सलिम सरदार शेख, अख्तर अली सय्यद, अरशद खलील शेख, हाजी जावेद अल्ताफ शेख, नवेद अल्ताफ शेख, शाहिद अल्ताफ शेख, वसिम सिकंदर (बल्ली), अजीम अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.
आमदार अरुणकाका जगताप म्हणाले की, सध्या फॅशनचे युग असून, युवक-युवतींमध्ये चांगले दिसण्यासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे. आकर्षक हेअर स्टाईल, मेकअप व वेगळ्या लुकसाठी तरुण मोठ्या शहरातील सलून मध्ये जातात. मात्र शहरातच गोल्डन सलूनच्या माध्यमातून लक्झरीयस सुविधा मिळणार आहे. तसेच अनेक युवक-युवतींना या सलूनच्या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध झाला असून, युवकांनी रोजगारासाठी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
हाजी जुनेद अल्ताफ शेख म्हणाले की, मोठे शहर व मॉल मधील सलूनच्या सुविधा नगरकरांना आपल्या शहरातच गोल्डन सलूनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सलूनमध्ये प्रोफेशनल कारागीर हेअर, स्किन, मेकअप व बॉडी ट्रीटमेंटच्या सेवा देणार असून, सलूनच्या सर्व सेवा योग्य दरात असून, त्यामध्ये देखील 30 टक्के डिस्काऊंट देण्यात आलेला आहे. महिलांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली असून, सलूनला एकदा आवश्य भेट देण्याचे त्यांनी आवाहन केले.
गोल्डन सलूनमध्ये पुरुषांसाठी हेअर कट पासून ते हेअर कलर, स्ट्रेटनिंग, फेशियल, ब्लिच व मसाजची सोय उपलब्ध आहे. तर महिलांसाठी अद्यावत स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट, स्ट्रेटनिंग, स्मुथिंग, केयरटीन, अॅक्वा हेअर स्पा, बॉडी पॉलिशिंगची सेवा उपलब्ध आहे. या सलूनला नगरसेवक नज्जू पैलवान, मन्सूर शेख, मुजाहिद (भा) कुरेशी, नगरसेवक मुदस्सर शेख, अकलाख शेख, साहेबान जहागीरदार, मुशाहिद शेख, उद्योजक पै. अफजल शेख, संभाजी कदम, राहुल पाटील (सुपा), अंजुम इनामदार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.