जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी मजलीस ए हुसैन कमिटी व अपना बाजार तेलीखुंटचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजानच्या पार्श्वभूमीवर तेलिखुंट येथे मजलीस ए हुसैन कमिटी व अपना बाजार तेलीखुंटच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/04/DSC_2306.jpg)
या इफ्तार पार्टीमध्ये राष्ट्रीय तिरंगा ध्वज लावून तसेच कुराण पठण करुन रोजा इफ्तार पार्टीला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वधर्मीयांचे धर्मगुरू व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हजेरी लाऊन सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जातीय सलोखा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे उपक्रम राबून एक चांगला संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे धार्मिक एकतेचे दर्शन घडले असून, समाजाला सद्भावनेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
![](https://mirrornews24.in/wp-content/uploads/2022/04/DSC_2307-1024x617.jpg)
इफ्तार पार्टीत पोलीस उपाधिक्षक अनिल कातकडे, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्योती गडकरी, शफी जहागीरदार, राजू जहागिरदार, अजर खान, मीरा बिल्डरचे इरफान जहागीरदार, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, आसिफ सुलतान, फैय्याज केबलवाला, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, आरपीआयचे शहर अध्यक्ष सुशांत म्हस्के, राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष गालीबअली सय्यद, जुनेद शेख (डीजे), रईस तांबोळी, नवेद शेख, दानिश शेख, सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे, विशाल वालकर, आवेज बागवान, वाहिद शेख, अज्जू शेख, अल्तमश जरीवाला, शाहरुख शेख, फिरोज शेख, अशरफ शेख, सज्जाद जहागीरदार, फैजान शेख, नदीम शेख, अहमद सय्यद, एजाज गब्बर, सालेकीन जहागीरदार आदीसह मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.