विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचा उपक्रम
प्रत्येक रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी एकत्र येणार समाजबांधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन बहुजन समाज जागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी बहुजन समाजाला एकत्र करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाणार आहे.
प्रारंभी भिम वंदना करुन संघटनेचे संस्थापक सचिन साळवे व अध्यक्ष उत्तम भिंगारदिवे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संगीता पाचारणे, सुनील पाचारणे, दीपक गायकवाड, आदित्य पाचारणे, बबन दिघे, श्रुती पाचारणे, प्रणल पाचारणे, करण पाचारणे, संदीप पवार, अविष्कार पाचारणे, नीता पाचारणे, नागेश भिंगारदिवे, संतोष भवरे, संजय भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
सचिन साळवे म्हणाले की, बहुजन समाज जागृती अभियान सामाजिक चळवळीची नांदी ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने बहुजन समाजाला संघटित करुन न्याय, हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी एकत्र आणण्याचे कार्य केले जात आहे. दर रविवारी बहुजन समाज एकत्र येऊन भविष्यातील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तम भिंगारदिवे यांनी बहुजन समाजाला मानसन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाने मिळाला आहे. त्यांचे विचाराने मार्गक्रमण केल्यास समाजाची प्रगती साधली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.