स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे जिल्ह्यात गरजू रुग्णांसाठी सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -मंगेश चिवटे
पाठपुरावा करुन अवघ्या चार तासात मिळवून दिली मदत
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्करोगाच्या दुर्धर आजारावर शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या चार तासात मदत उपलब्ध करुन दिल्याबद्दल शहरातील रुग्ण अशोक गंगाधर जाधव यांनी दिलेले आभार पत्र स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन अहमदनगर विभागाच्या वतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना देण्यात आले. यावेळी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे संपर्कप्रमुख रणजीत परदेशी, शिवसेनेचे (बाळासाहेबांची) उपजिल्हाप्रमुख काका शेळके व शहर प्रमुख अनिकेत कराळे पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिली जात आहे. प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा देखील सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील गरजूंना वैद्यकीय मदत देण्यास हा विभाग कटबिध्द असून, गरजू पर्यंत मदत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
कर्करोगाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेले अशोक गंगाधर जाधव यांना शहरातील एका हॉस्पिटलने शस्त्रक्रिया सांगितली होती. यासाठी मोठा खर्च येणार होता. जाधव सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना हा खर्च अवाक्याबाहेरचा होता. त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळण्याची मागणी केली होती.
याबाबत संबंधित पदाधिकार्यांनी पाठपुरावा करुन अवघ्या चार तासात एक लाख रुपयाची मदत मिळवून दिली. शस्त्रक्रिया होऊन घरी परतलेले रुग्ण जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आभार मानणारे पत्र दिले आहे. ते नुकतेच संबंधित विभागातील अधिकार्यांना पोहच करण्यात आले.
