सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा समावेश असलेल्या हाईराइडरची ग्राहकांना भुरळ
सहाशेपेक्षा अधिक ग्राहकांची शोरुमला हजेरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत समावेश झालेली व ग्राहक वर्गाच्या प्रतिक्षेत असलेली टोयोटाची द अर्बन क्रुझर हाईराइडरचे अनावरण केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आमदार अरुणकाका जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले.
सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा समावेश असलेल्या या कारच्या बुकिंगला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ही कार पहाण्यासाठी सहाशेपेक्षा अधिक ग्राहकांनी हजेरी लावली होती. मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असल्याने अनेक ग्राहक आत्तापासूनच दिवाळी, दसर्यासाठी हाईराइडरची बुकिंग करत आहे.
या कार अनावरणप्रसंगी राजेंद्र चोपडा, सुमतीलाल कोठारी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, चंद्रकांत गाडे, रमाकांत गाडे, अॅड. ललित गुंदेचा, योगेश मालपाणी, इद्रजीत नय्यर, हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, राकेश गुप्ता, संजय ताथेड, महेंद्र छाजेड, जय रंगलानी, अभिमन्यू नय्यर, मनोज मदान, टोयोटाचे ऑफिसर अभिजीत पळनीटकर, शोरुमचे जनक आहुजा, तेजी बेदी, अनिश आहुजा, दीपक जोशी, अविनाश अडोलकर, लकी खूपचंदानी, धनेश बोगावत, कैलाश नवलानी, गौरव चव्हाण, रवींद्र कुलकर्णी, प्राची जामगावकर आदी उपस्थित होते.
हाईराइडर एसयुव्ही निओ ड्राईव्ह आणि सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन या दोन पावर ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. ही एसयूव्ही 7 आकर्षक मोनोटोन रंगसंगतीत आणि बाह्य बाजूला 4 दुहेरी टोन रंगसंगतीत उपलब्ध करण्यात आली आहे. मोनोटोन रंगांमध्ये केव्ह ब्लॅक, स्पोर्टीन रेड, स्पिडी ब्लू, एन्टिसिंग सिल्वर, गेमिंग ग्रे आणि मिडनाईट ब्लॅकचा समावेश आहे. तर दुहेरी टोन रंगांमध्ये ब्लॅक रुफसह कॅफे व्हाईट, स्पोर्टिन रेड, एन्टिसिंग सिल्व्हर आणि स्पिडी ब्लूचा समावेश असल्याची माहिती तेजी बेदी यांनी दिली.
आमदार अरुणकाका जगताप म्हणाले की, बदलते तंत्रज्ञान व फॅशनच्या युगात आकर्षक स्पोर्टी लुक आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा समावेश असलेली हाईराइडर ग्राहकांच्या पसंतीस उतरणार आहे. ग्राहक या कारच्या प्रतिक्षेत होते, असे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. हाईराइडरचे बुकिंग करणारे डॉ. संजय असनानी, लक्ष्मीकांत कोटीकर व इतर ग्राहकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पोळ यांनी केले. आभार अनिश आहुजा यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
द अर्बन क्रुझर हाईराइडरची ही वैशिष्टे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
पेनोरामिक सनरुफ, हेड अप डिस्प्ले आणि 360 अंश कॅमेराने सुसज्ज असलेल्या एसयुव्हीत वाहन चालविण्याचा अप्रतिम अनुभव मिळणार आहे. आय कनेक्ट, 9 इंची नवीन स्मार्ट प्ले कास्ट आणि वायरलेस चार्जिंगसह स्मार्ट डिव्हाईस इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स, 6 एअर बॅग, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम, टीपीएमएस, क्रूझ कंट्रोल, फ्रंटसीट पिटी/एफएल, ईबीडीसह एबीएस, व्हेईकल स्टॅबिलीटी कंट्रोल अॅडव्हान्स बॉडी स्ट्रक्चर, हिल होल्ड कंट्रोल, रिअर 3 पॉइंट सीटबेल्ट आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि प्रगत आवाज नियंत्रण, रिमोट व्हेइकल इग्निशन स्टार्ट/स्टॉप, रिमोट एसी कंट्रोल, चोरीला गेलेले वाहन ट्रॅकिंग करण्याची सुविधा, रिमोट मोबिलायझरने सुसज्ज.