हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी
विविध क्षेत्रात यश मिळविणार्या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्चुअलच्या युगात सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मनुष्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. एकत्र आल्याने विचारांची देवाण-घेवाण होऊन समाजाला दिशा देण्यासाठी कार्य उभे राहते. मागील चोवीस वर्षापासून दररोज पहाटे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्य व पर्यावरणाची चालविण्यात आलेली चळवळ दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सीए रविंद्र कटारिया यांनी केले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या चोवीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व विविध क्षेत्रात यश संपादन करणार्या ग्रुपच्या सदस्यांना सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सीए कटारिया बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे सीए रवींद्र कटारिया, महेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकरराव मुंडे, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, स्वामी विवेकानंद प्रबोधनीचे अध्यक्ष प्रमोद मुळे, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, वृंदावन समूहाचे रामचंद्र बिडवे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे कटारिया म्हणाले की, हरदिनच्या माध्यमातून निस्वार्थपणे सामाजिक कार्य केले जात आहे. सर्व जात, धर्म, पंथाचे लोक एकत्र येऊन सामाजिक योगदान देत आहे. समाज व निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी सुरु असलेली ही चळवळ अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, हरदिनचे पाचशे पेक्षा जास्त सभासद आरोग्य व पर्यावरण चळवळीत योगदान देत आहे. तर गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. वर्षभर वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, योग शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना मदत आदी विविध सामाजिक उपक्रम सुरु असतात. तर ग्रुपचे अनेक सदस्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेत सर्वात जुनी व अवघड कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणारे ग्रुपचे सदस्य योगेश खरपुडे, गौतम जायभाय, विलास भोजने, जगदीप मक्कर तसेच विविध क्षेत्रात यश संपादन करणार्या सदस्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी आरोग्य व पर्यावरण चळवळ समाजाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून हरदिनचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकरराव मुंडे म्हणाले की, ग्रुप बनवणे सोपे असले तरी, ते टिकवणे व चालवणे अत्यंत कठिण आहे. विधायक कार्यासाठी एकत्र आलेले हरदिनचे कार्य प्रेरणा देणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असून, वर्षभर विविध सामाजिक व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. यावेळी रमेश वराडे, दीपक बडदे, दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, विठ्ठल लोखंडे, सुभाष होडगे, अभिजीत सपकाळ, सुमेश केदारे, अशोक पराते, सचिन पेंडुरकर, दीपक अमृत, किशोर भगवाने, दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, सुभाष पेंडुरकर, एकनाथ जगताप, सरदारसिंग परदेशी, सूर्यकांत कटोरे, संपत बेरड, दीपक धाडगे, अनंत सदलापूर, राहुल दिवटे, सुहास ढुमणे, सुंदर पाटील, विठ्ठलराव राहिंज, सिताराम परदेशी, अविनाश काळे, संजय वाकचौरे, राजू कांबळे, विलास तोतरे, अविनाश जाधव, मनोहर पाडळे, धर्मराज संचेती, रमेश कोठारी, संतोष लुणिया, माजिद शेख, जयकुमार मुनोत, दीपक घोडके, अशोक कानडे, ईवान सपकाळ, मच्छिंद्र बेरड, संतोष हजारे, सदाशिव मांढरे, अविनाश पोतदार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. संतोष गिर्हे यांनी न्युरोथेरपीची तपासणी करुन उपचार केले. तर डॉ. सुदर्शन गोरे यांनी दातांची तपासणी करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक अमृत यांनी केले. आभार रमेश वराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय खंडागळे, दीपक शिंदे, जालिंदर अळकुटे, प्रफुल्ल मुळे, विनोद खोत, केशवराव दवणे, कांता वाघुले, सुनील ठोकळ, नारायण नायकू, पवन वाघमारे, रमेशलाल खंडेलवाल, शेषराव पालवे, जालिंदर बेरड, दादासाहेब नवले, प्रकाश देवळालीकर, विनोद मुथा, सचिन कस्तुरे, किरण फुलारी, राधेश्यामसिंग ठाकूर, कुमार धतुरे, राजू शेख, महेश सरोदे, भारती कटारिया, विद्या जोशी, प्रांजली सपकाळ, लक्ष्मी गायकवाड, तन्वी शेख, चंद्रकला येलुलकर, अश्लेशा पोतदार, सीमाताई केदारे, उषाताई ठोकळ, ज्योती परदेशी, ऐश्वर्या परदेशी, मीनाक्षी खोगरे, संगीता सपकाळ, वंदना मेहेत्रे, कविता भिंगारदिवे, मेघा बकरे, अनिता शेलार यांनी परिश्रम घेतले.