• Sat. Mar 15th, 2025

लायन्स क्लबच्या संयुक्त बैठकित सामाजिक कार्याचा जागर

ByMirror

Feb 16, 2023

सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य लायन्स क्लब करत आहे -राजेश कोठावडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लबने सामाजिक भाव जागृत करण्याचे काम करुन, वंचितांना आधार देण्याचे काम केले जात आहे. स्वत:पासून सामाजिक चळवळ उभी करुन शहरात सेवाभावाने एकत्र आलेल्यांनी मोठी सामाजिक चळवळ उभी केली. कोरोना काळात लंगर सेवेच्या माध्यमातून ही चळवळ प्रामुख्याने समाजासमोर आली असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावडे यांनी केले.


लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहमदनगर प्राईड व लिओ क्लब ऑफ अहमदनगर या तिन्ही क्लबची संयुक्त आढावा बैठक शहरातील स्कायब्रीज येथे पार पडली. यावेळी पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना प्रांतपाल कोठावडे बोलत होते. याप्रसंगी रीजन चेअरमन सुनील साठे व झोन चेअरमन आनंद बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुढे प्रांतपाल कोठावडे म्हणाले की, माणुसकीने माणुस जोडून सेवाभाव जपडण्याचे कार्य सुरु आहे. हाच संस्कार लिओ क्लबच्या माध्यमातून भावी पिढीत रुजवून सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य लायन्स करत आहे. क्लबमध्ये जात, पंथ व धर्मापलीकडे जाऊन सर्व माणुसकीच्या भावनेने एकवटले असल्याचे स्पष्ट केले. तर तिन्ही क्लबच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा त्यांनी घेतला.


प्रारंभी माजी प्रांतपाल हेमंत नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत सुनिल छाजेड यांनी केले. याप्रसंगी तिन्ही क्लबचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी आपला अहवाल सादर केला. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. सिमरनकौर वधवा, अभिजीत भळगट, हरमनकौर वधवा, सचिव प्रणिता भंडारी, सनी वधवा, खुशबू माखीजा, खजिनदार प्रिया मूनोत, मनयोग माखीजा, प्रिशा बजाज, प्रीती बोरा, दिशा तलवार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


अंजली कुलकर्णी, रिद्धी धुप्पड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय भंडारे व हरजितसिंह वधवा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *