युवकांना फक्त खांद्यावर झेंडे घेण्यापुरते मर्यादीत न ठेवता, त्यांच्यात नेतृत्व निर्माण केले जात आहे -सुनिल साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या अहमदनगर युवक जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल विजय सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे व युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे यांच्या हस्ते अमोल सोनवणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या बैठकीसाठी नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, राहुरी महिला तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष बंटी गायकवाड, युवा नेते हर्षल कांबळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव मगर, जामखेड तालुका कार्याध्यक्ष सतीश साळवे, नगर तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, शहर उपाध्यक्ष प्रतिक नरवडे, अनिल इंगळे, राजू मगर, अक्षय सोनवणे, बापू जावळे, निखिल भोसले, आकाश सोनवणे, प्रशांत सोनवणे, संतोष रंधवे, रोहित सोनवणे, अभिषेक लाटे, आनंद मगर, पटेकर सर, कदम आदींसह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले मार्गक्रमण करत आहे. युवकांना फक्त खांद्यावर झेंडे घेण्यापुरते मर्यादीत न ठेवता रिपाईमध्ये त्यांना सन्मानाची वागणुक देऊन त्यांच्यात नेतृत्व निर्माण केले जात आहे. तर विविध पदाच्या माध्यमातून संधी देण्याचे कार्य सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात उत्तम प्रकारे पक्षाचे संघटन सुरु असून, शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात जिल्ह्याची शक्ती दिसून आली. भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युवा कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे त्यांनी सूचना केल्या.
राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी जिल्ह्यात युवकांची मोठी फळी उभी राहिली असून, अहमदनगर जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. रिपाईच्या माध्यमातून मोठा युवा वर्ग पक्षाला जोडला गेला आहे. युवक हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे म्हणाले की, युवा वर्ग समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कार्य करत आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊन, अन्यायाचा बिमोड करण्यासाठी रिपाईचे युवक सरसावले आहे. आरपीआय हा एका समाजापुरता मर्यादीत नसून, सर्व समाजातील युवकांना बरोबर घेऊन पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित युवक जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांनी पक्षातील ध्येय-धोरणानूसार कार्य करुन रिपाईच्या निळ्या झेंड्याखाली सर्व युवकांना संघटित करण्याचे कार्य केले जाणार असल्याचे सांगितले.